Tiranga Times Maharastra
मिळालेल्या माहितीनुसार, घरात झालेल्या वादानंतर मारहाणीच्या भीतीने ही महिला मध्यरात्री बाहेर पडली होती. सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या उद्देशाने ती वारली हाट परिसरात गेली. मात्र तिथेच तिच्यावर अत्याचार झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील आरोपी हा त्या ठिकाणी काम करणारा वॉचमन असून तो महिलेला ओळखीचा आणि नात्यातीलच असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. रात्रभर महिलेचा आक्रोश परिसरात घुमत राहिला, मात्र निर्जन परिसरामुळे मदत मिळू शकली नाही.
सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला. मनोरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलं असून पीडित महिलेवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
घरगुती वादातून बाहेर पडलेल्या महिलेवर घडलेली ही घटना महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
